आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाकाय भोपळा, कारच्या वजनाएवढा अवाढव्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झुरिक | स्वित्झर्लंडमधील एका शेतक-याने भला मोठा भोपळा पिकवला असून त्याचे वजन एका छोट्या कारएवढे आहे. या भोपळ्याचे वजन ९५० किलोपेक्षा अधिक आहे.

जर्मनीतील प्रदर्शनाची शान
ज्या शेतात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली, तेथील प्रवक्त्या माइका जिल म्हणाल्या की, एवढा मोठा भोपळा पिकवण्यासाठी खूप मोठी सिंचन व्यवस्था आणि दररोज देखभालीची गरज असते. सध्या हा भोपळा जर्मनीतील क्लाइस्टोव्ह शहरातील एका प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे. २ नोव्हेंबरनंतर त्याला कापले जाईल. या भोपळ्याच्या बियांना खूप मागणी असते. त्यामुळे त्याचा लिलावदेखील केला जाऊ शकतो.

एक प्रयत्न अपयशी
बेनी यांनी मागील वर्षी यापेक्षाही जास्त वजनाचा म्हणजेच १०५३ किलो वजनाचा भोपळा पिकवला होता. मात्र, त्या भोपळ्याला एका ठिकाणी छेद गेल्यामुळे गिनीज बुकच्या स्पर्धेतून तो बाद झाला. त्यामुळे यंदा मात्र त्यांनी या भोपळ्याला विशेष काळजी घेऊन स्पर्धेच्या ठिकाणी आणले.

भोपळोबासाठी मोठ्ठे वाहन
३० वर्षांच्या बेनी मीर यांना हा भोपळा एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेण्यासाठी एका विशेष वाहनाचा वापर करावा लागला. ग्रेट पंपकिन कॉमनवेल्थ असोसिएशनच्या अधिका-यांसमोर या भोपळ्याचे वजन मोजण्यात आले. त्यानंतरच या भोपळ्याने जागतिक विक्रम मोडीत काढल्याचे जाहीर करण्यात आले. यापूर्वी सर्वात जास्त वजनाचा भोपळा पिकवण्याचा मान गिनीज बुक रेकॉर्डनुसार कॅलिफोर्नियातील टीम आणि सुसान मॅथिसनच्या नावावर होता.