आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशाल त्सुनामीचा अंदाज येणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- भूकंपानंतर उद्भवणार्‍या विशाल त्सुनामीची पूर्वसूचना देणारे तंत्र शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. जपानमध्ये 2011 मधील भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीचा अभ्यास करून स्टॅँडफोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी इशारा प्रणालीचे तंत्र विकसित केले आहे. 11 मार्च 2011 रोजी जपानमध्ये 9.0 तीव्रतेच्या भूकंपानंतर दक्षिण भागात अर्धा तास त्सुनामीच्या लाटा धडकल्या. या दुर्घटनेत 15 हजार 800 नागरिक ठार तर 6,100 जण जखमी झाले. भूकंपानंतर उत्पन्न झालेल्या ध्वनिलहरीच्या नोंदीवरून त्सुनामीची शक्यता पडताळली जाऊ शकते. ध्वनिलहरींचे संगणकांवर योग्य विश्लेषण केल्यास विभाल त्सुनामीचा धोका वेळीच ओळखता येऊ शकेल, असा दावा करण्यात आला आहे. समुद्रामधील भूकंपाचा अंदाज बांधू शकणारी अनेक तंत्र सध्या अस्तित्वात आहेत. मात्र, भूकंपामुळे त्सुनामीची मोठी आपत्ती ओढवणारे व लाटाचे आकार सांगू शकणारे तंत्र उपलब्ध नाही. या तंत्रातून त्सुनामीची कल्पना मिळू शकते, असा दावा आहे.