आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: अमेरिकातील न्यूजर्सीमध्ये बनवण्यात आले जगातिल सर्वात मोठे हिंदू मंदिर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: न्यूजर्सीतील स्वामीनारायण मंदिर)

न्यूजर्सी
- न्यूजर्सीच्या रॉबिंसविलेमध्ये असलेले स्वामीनारायण संप्रदायाचे हे मंदिर भारताबाहेरील सर्वात मोठे हिंदू मंदीर आहे. अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये भारतीयांची सर्वात जास्त भारतीयांची लोकसंख्या आहे. मंदीराची निर्मिती बोचासनवासी अक्षर पुरूषोत्तम स्वामीनारायण संस्थेने केले आहे. जवळपास 162 एकरमध्ये असलेल्या या मंदिराच्या शिल्पाकृतींमध्ये प्राचिन भारताची संस्कृतीचे दर्शन घडते. न्यूजर्सीच्या रॉबिंसविलेमध्ये असलेल्या स्वामीनारायण संप्रदायाचे हे मंदिर भारताबाहेर असणारे सर्वात मोठे मंदिर आहे.

हे मंदिर 134 फुट लांब आणि 87 फुट रुंद आहे. यामध्ये 108 खांब आणि तीन सभागृह आहेत. न्यूजर्सीच्या रॉबिंसविले शहरात असलेले हे मंदिर शिल्पशास्त्रानुसार बनवण्यात आले आहे. मागे 10 ऑगस्टला बीएपीएसचे सर्वोसर्वा प्रमुख स्वामी महाराज यांनी या मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली. आता हे मंदिर सामान्य नागरिकांसाठी उघडे करण्यात आले आहे.

या मंदिराच्या निर्मितीसाठी तब्बल 1.8 कोटी युएस डॉलर (जवळपास 108 कोटी रुपये) एवढा खर्च आला आहे. या संपूर्ण मंदिरासाठी 68 हजार क्युबिक फुट एवढ्या इटालियन करारा संगमरवराचा वापर करण्यात आला आहे. श्री स्वामीनारायण मंदिराच्या कलात्मक डिझाईनसाठी 13,499 हजार दगडांचा उपयोग करण्यात आला आहे. या दगडांवरील संपूर्ण नक्षीकाम भारतातच करण्यात आले आहे. नक्षीकाम पुर्ण झाल्यानंतर याला समुद्रीमार्गाने न्यूजर्सीपर्यंत पोहोचवण्यात आले.
1000 वर्षांपर्यंत असेच उभा असेल मंदिर
अमेरिकेचे पत्रकार स्टीव ट्रेडरने बीएपीएसच्या श्री स्वामीनाराण मंदिराचे दर्शन घेतल्यावर न्यूजवर्क्स साईटवर यामंदिराबद्दल लिहिले आहे. ते म्हणतात, मंदिरात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला एकापेक्षा एक अशा अद्भूत कलाकृती पाहावयास मिळतात. त्यांच्यावरून नजर हटणे शक्यच नाही. याशिवाय या मंदिराच्या आतील भागासोबतच मंदिराचा बाहेरील भाग अशा काही पध्दतीने बनवण्यात आला आहे की, हे मंदिर 1000 वर्षांपर्यंत अशाच पध्दतीने उभे राहिल.

फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...