Home | International | China | biging, china, international news

चांगले जीवन जगणा-याला भारतात पुनर्जन्म मिळतो

वृत्तसंस्था | Update - Jun 19, 2011, 03:15 AM IST

एखादी व्यक्ती चांगले जीवन जगत असेल तर तिला भारतात पुनर्जन्म मिळतो,’ असे एकदा चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक माओ-त्से-तुंग म्हणाले होते.

  • biging, china, international news

    बीजिंग: एखादी व्यक्ती चांगले जीवन जगत असेल तर तिला भारतात पुनर्जन्म मिळतो,’ असे एकदा चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक माओ-त्से-तुंग म्हणाले होते. या आठवणीला भारताचे राजदूत एस. जयशंकर यांनी उजाळा दिला आहे. ते शनिवारी येथील संमेलनात मार्गदर्शन करताना बोलत होते.
    ‘आशियाचा इतिहास व संस्कृतींचे आकलन’ या विषयावर येथे सुरू असलेल्या संमेलनात दोन्ही देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. हे संमेलन दोन्ही देशांच्या वतीने संयुक्तरीत्या आयोजित करण्यात आले आहे. या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, माओंच्या रेड बुकमधील अनेक संकलित म्हणी जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांनी भारताविषयी सांगितलेल्या या गोष्टींकडे कोणीही लक्ष दिले नाही, असे जयशंकर म्हणाले. वास्तव असे आहे की, दोन्ही देशांचा खूप जुना संबंध आहे; परंतु मधल्या काळात दोन्ही देशांच्या संबंधात बरेच चढ-उतार आले. त्यामुळे लोक या गोष्टी विसरून गेले. ही घनिष्ठता लक्षात घेतली पाहिजे. बौद्ध तत्त्वज्ञान भारतातून चीनमध्ये गेले. उभय देशांतील संबंधांचे प्रतीक आहे.

Trending