आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोळधाडीसाठी चिनी कोंबड्यांची फौज

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - हिरव्यागार शेतीवर हल्ला करून टरारलेली पिके रातोरात फस्त करणा-या टोळधाडीच्या मुकाबल्यासाठी चीनने आता कोंबड्यांची फौज उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनच्या वायव्य भागातील गांसू प्रांताच्यावतीने या महिन्यात नऊ शहरे आणि परगण्यांमध्ये सुमारे 1 लाख कोंबड्या पाठवण्यात येणार आहेत.यामध्ये तिबेट परगण्यातील झिहे आणि तिआनझु प्रांतांचाही समावेश आहे. गांसू प्रांतामधील 13.3 लाख हेक्टरची कुरणे दरवर्षी टोळधाड आणि किटके फस्त करतात अशी माहिती प्रांतिय कृषी खात्याने दिली. दरवर्षी हिरवीगार शेती आणि जनावरांसाठीची कुरणे टोळधाडीमुळे फस्त करीत असल्याने शेतीउदयोगावर विपरित परिणाम होतो.असे कृषी खात्याच्या अधिका-याने सांगितले.
सन 2010 मध्ये प्रथम कुरणांवरच मोठ्या प्रमाणात कुकुटपालनाव्दारे कोंबड्यांची पैदास करण्यात आली. कुक्कुटपालनामुळे या कुटंूबांना सरासरी 2 ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षी दक्षिण गांसू भागातील विविध दहा
परगण्यांमध्ये 85 हजार कोंबड्यांची पैदास करण्यात आली. आणि एकूण सुमारे पाच कोटी रुपयांचा फायदा झाल्याचे कृषी खात्याच्या अहवालात म्हटले आहे.गांसू भागात 1 कोटी 8 लाख हेक्टर परिसरात कुरणे आहेत.
चीन अंतराळ तंत्रज्ञानात अमेरिकेला ‘पछाडणार’
सहा वर्षांत अमेरिकेपेक्षा महासत्ता होणार चीन
चीन सीमेवर रस्त्यांसाठी 25 हजार कोटींचा निधी