आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
न्युयॉर्क - जगभरात योगाला अतिशय महत्त्वप्राप्त होत आहे. त्यामुळे योगगुरुंचाही सुळसुळाट झाला आहे. विक्रम चौधरी या अतिश्रीमंत योगगुरूचा जगात बोलबाला आहे. मात्र, सध्या चौधरी अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या एका तरुण शिष्येने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
विक्रम चौधरी यांच्या २९ वर्षीय सारा बॉन नामक शिष्येने आरोप केला आहे की, २००७ मध्ये चौधरी यांनी तिला डीनर ऑफर केले होते त्यानंतर त्यांनी सेक्सची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर २००८ मध्ये त्यांनी पुन्हा तिला वासनेचे शिकार बनविण्याचा प्रयत्न केला होता.
सारा बॉन हिने लॉस एंजिल्स येथील न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्यात म्हटले आहे की, विक्रम चौधरी यांनी तिच्या मर्जीविरूद्ध तिला स्पर्ष केला आणि अश्लिल कॉमेंट्स केले होते.
विक्रम चौधरींची ऑफर बॉनने नाकारल्यानंतर त्यांनी तिचे करिअर संपवण्याची धमकी दिली होती. बॉनने घडलेली सर्व हकिकत तिच्या प्रियकराला सांगितली, मात्र, त्यानंतरही लैंगिक शोषण सुरुच होते. एकदा चौधरींनी बॉनला सर्वांसमोर किस करण्यास सांगितले. त्यानंतरही पुन्हा एकदा त्यांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता.
पुढील स्लाईडमध्ये वाचा, योगगुरु विक्रम चौधरींचा योगाचा कारभार किती देशांमध्ये पोहचला.
कोण - कोण आहेत त्यांचे शिष्य.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.