आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bilawal Bhutto News In Marathi, Pakistan, Kashmir, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मीरचे इंच इंच भूमी परत घेऊ, बेनझीर भुत्तोचा मुलगा बिलावलची वल्गना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - काश्मीर पाकिस्तानचेच असल्याचे सांगत या प्रदेशातील इंच इंच भूमी परत मिळवू, अशी वल्गना पाकच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचा पुत्र बिलावल भुत्तो याने शनिवारी केली.मुलतानमध्ये माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या निवासस्थानी पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोर बिलावल म्हणाला की, मी भारताकडून संपूर्ण काश्मीर परत घेईन.
इंचभर जमीनही सोडणार नाही. कारण इतर प्रांतांसारखा हा भागही पाकचाच अविभाज्य भाग आहे. या वक्तव्याला प्रत्युत्तर देत भाजप उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, पाक नेते काश्मीरच्या पॅराशूटवर बसून राजकारण साधत आहेत. काँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले, एके दिवशी पाकव्याप्त काश्मीरही भारताचाच भाग असेल.

२०१८ मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक लढवण्याची घोषणा बिलावलने केलेली आहे. पाकमध्ये चलनी नाणे असलेला काश्मीरचा मुद्दा त्याने राजकारणातील एंट्रीसाठी उठवला आहे.

हे दिवास्वप्न : भारत
बिलावल भुत्तो यांचे काश्मीरबाबतचे वक्तव्य वास्तवापासून खूप दूर असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटले आहे.

२०० दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर २०० सशस्त्र दहशतवादी घुसखोरीसाठी सज्ज असल्याचे लष्करी अधिका-याने सांगितले. दरम्यान, कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी ४ दहशतवाद्यांना ठार केले.