आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bilawal Bhutto Said, We Are Not As Victims Of Gujarat, Modi Keep In This Mind

बिलावल भुत्तो पुन्हा बरळला ! आम्ही गुजरातपीडितांसारखे नाहीत, ही गोष्ट मोदींनी ध्यानात घ्यायला हवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचा मुलगा बिलावल भुत्तो याचे सोशल मीडियातील बरळणे अजूनही सुरूच आहे. त्याने टि्वटरवरून पुन्हा अकलेचे तारे तोडले आहेत. काश्मीरवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. आम्ही गुजरातपीडितांसारखे नाहीत, ही गोष्ट मोदींनी ध्यानात घ्यायला हवी, असे त्याने म्हटले आहे.

भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील गोळीबाराला भारत जबाबदार आहे. पाकिस्तानच्या विरोधात भारत इस्रायलसारखे वर्तन करत आहे. आम्ही गुजरातपीडितांसारखे नाहीत. आम्हीसुद्धा प्रत्युत्तर देऊ शकतो, अशा शब्दांत सोशल मीडियातून त्याने बालिशपणा केला आहे. बिलावलने ट्विटरवर अकलेचे तारे तोडल्यानंतर त्याच्या विचारांची मात्र खिल्ली उडवण्यात येत आहे.

ट्विटरवर त्याने इस्रायलचे स्पेलिंग चुकीचे लिहिले आहे. ऑक्सफर्डमध्ये शिक्षण घेऊनही सोशल नेटवर्किंग साइटवर इंग्रजीच्या चुका केल्याबद्दल युजर्सने त्याची खिल्ली उडवल्याचे दिसून आले आहे.

अगोदरही बडबड
बिलावलने गेल्या महिन्यातच काश्मीरची एक इंचही जमीन भारताला देणार नसल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर त्याच्यावर मीडियातून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.