आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिलावल भुट्टोने सोडले पाकिस्तान; वडील झरदारींवर नाराज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांचे सुपुत्र बिलावल भुट्टो पाकिस्तान सोडून दुबईला गेले आहेत. बिलावल यांच्या अचानक पाकिस्तान सोडण्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, वडिल झरदारी यांच्यावर नाराज असल्याने बिलावल यांनी पाकिस्तान सोडले असल्याचे सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानमध्ये ११ मे रोजी निवडणूक आहे. बिलावल आपला पक्ष 'पीपीपी'मध्ये संरक्षकाची भूमिका पार पाडत होते, परंतु वडिलांसोबत झालेल्या मतभेदांमुळे बिलावलने पाकिस्तान सोडले आहे. यामध्ये दहशतवादी हिंसा, शिया समुदायाच्या विरुध्द होत असलेले हल्ले आणि निवडणुकीत तिकिटांचे वाटप हे मुद्दे आहेत.

निवडणुकीपूर्वी बिलावलने पाकिस्तान सोडणे हा 'पीपीपी'साठी चिंतेचा विषय बनला आहे. बाप-लेकामध्ये विविध मुद्यांवर मतभेद होते, ज्यामध्ये तरुणांशी निगडीत मुद्यांकडे पीपीपीने दुर्लक्ष केले होते. विशेष म्हणजे हे मुद्ये माजी क्रिकेटर आणि राजकीय नेता इम्रान खानची पार्टी पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफने उचलून धरले आहेत.

सांगण्यात येत आहे की, बिलावलचे आपली आत्या फरयाल तालपूर यांच्याशीही मतभेद आहेत. बिलावलने सिंध प्रांतात काही लोकांना तिकीट देण्याची शिफारस केली होती, परंतु फारयाल यांनी या शिफारसीकडे दुर्लक्ष केले. झरदारींची बहिण फरयाल तालपूर यांचे पीपीपी पक्षामध्ये महत्वाचे स्थान आहे.