आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुसलेले बिलावल भुत्तो पाकिस्तानात परतले, निवडणूक प्रचारापासून दूर राहणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची/ लाहोर - दुबईमध्ये आठवडाभर घालवल्यानंतर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुत्तो झरदारी मंगळवारी पाकिस्तानात परतले. मात्र, 11 रोजी होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाच्या प्रचाराची धुरा ते सांभाळणार नाहीत.
बिलावल हे पक्षाच्या प्रचार मोहिमेचा एक भाग असतील परंतु प्रचार मोहिमेचे नेतृत्व ते करणार नाहीत, असे बिलावल यांचे मुख्य अधिकारी हाशम रियाज यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती असलेले वडील असीफ अली झरदारी आणि आत्या फरयाल तलपूर यांच्याशी पीपीपीच्या मुद्यावर मतभेद झाल्यानंतर 24 वर्षीय बिलावल गेल्या महिन्यात पाकिस्तान सोडून दुबईत गेले होते. बिलावलचा रुसवा काढण्यासाठी स्वत: झरदारी 30 मार्च रोजी दुबईला गेले होते. झरदारी आणि बिलावल मंगळवारी सकाळी विमानाने कराचीत पोहोचले. पाकिस्तानमध्ये निवडणूक लढवण्यासाठी 25 वर्षे वयाची अट आहे. येत्या सप्टेंबरमध्ये बिलावल 25 वर्षांचे होतील तेव्हाच त्यांना निवडणुकीला उभे राहता येणार आहे. बिलावल आणि झरदारी यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. ते दुबईला नेहमीच जातात. त्यामुळे त्यांची भेट वादाच्या नजरेतून पाहू नये, असे रियाज यांनी म्हटले आहे.