आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bill Clinton Hints Hillary Could Run For President In 2016

2016 साली हिलरी क्लिंटन अमेरिकन अध्यक्षपदाच्या उमेदवार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री व माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्‍लिंटन या 2016 साली होणा-या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार असू शकतात, अशी हिंट त्यांचे पती खुद्द बिल क्‍लिंटन यांनीच दिली आहे.

अमेरिकेत 2016 साली होणा-या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जनतेसमोर काही चांगले पर्याय उपलब्ध असतील, असे बिल क्‍लिंटन यांनी शनिवारी सेंट लुईस येथील एका सभेत सांगितले. त्यामुळे हिलरी यांचे नाव आणखी वेगाने पुढे येईल, असे बोलले जात आहे.

बिल म्हणाले, अमेरिकेत एखाद्या व्यक्तीला तीन वेळा अध्यक्षपद होण्यास आपला पाठिंबा आहे. मात्र सलग दोन वेळा अध्यक्षपद राहिल्यानंतर लगेच त्याला सलग तिस-यांदा अध्यक्षपद देऊ नये. त्यानंतरच्या काळात तो तिस
-यांदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतो. सलग दोन वेळा एखाद्या व्यक्तींने निवडून येण्याच्या अधिकाराला सगळ्या अमेरिकनचा पाठिंबा तसाच माझाही आहे.

याआधीही हिलरी क्लिंटन 2016 च्या अध्यक्षपदाच्या उमेदवार असतील, असे बोलले जात होते. त्यामुळेच त्यांनी पुढील काळात आपल्याला अधिक वेळ मिळावा म्हणून ओबामा प्रशासनातून परराष्ट्रपदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले गेले होते. तसेच अमेरिकेत अद्याप एकही महिला अध्यक्ष बनली नाही. हिलरी क्लिंटन यांच्याकडे मोठा अनुभव असल्याने व त्यात त्यांच्या पतीचीही त्यांना मोठी मदत होईल व त्या एक तुल्लबळ उमेदवार ठरतील, असे अमेरिकेत बोलले जात आहे. त्यामुळे 2016 ची अध्यक्षपदाची निवडणूक हिलरी क्लिंटन जवळपास लढवतील, असे पक्के मानले जात आहे. तसेच सलग दोन अध्यक्षपदी राहिलेल्या व्यक्तीला तिस-यांदा अध्यक्षपद मिळावे, या संकल्पनेमागे कमी वय असलेले व सलग दुस-यांदा अध्यक्षपदी बसलेले बराक ओबामा यांच्यासाठीच बिल क्लिंटन आग्रही असल्याचे दिसते. तसेच झाल्यास हिलरी 2016 व 2020 किंवा 2024 ला पुन्हा ओबामा अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात.