आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल क्लिंटन यांच्या 15 वर्षे जुन्या लॅपटॉपचा लवकरच लिलाव; 60 लाख किंमत?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या 15 वर्षे जुन्या लॅपटॉपचा लवकरच लिलाव होणार आहे. बिल क्लिंटन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पहिला सरकारी ई-मेल याच लॅपटॉपवरून पाठवला होता.

विशेष म्हणजे नोव्हेंबर, 1998 मध्ये या लॅपटॉपवर स्पेस शटल एस्ट्रोनॉट जॉन ग्लेन यांनी क्लिंटन यांना ई-मेल पाठवला होता. क्लिंटन यांनी जॉन यांच्या ई-मेलला प्रतिसादही दिला होता. दोन्ही ईमेल आजही लॅॅपटॉपच्या हार्ड ड्राइव्हमध्ये सेव्ह आहेत. तोशिबा कंपनीचे हा लॅपटॉप असून आजही सुस्थितीत आहे.

मॅसाचुसेट्‍स येथील ' आरआर ऑक्शन' ही कंपनी क्लिंटन यांच्या लॅपटॉपचा ऑनलाइन लिलाव करणार आहे. 'आरआर ऑक्शन' ही कंपनी दुर्मिळ वस्तु विकण्यासाठी परिचित आहे. 'क्लिंटन यांचा लॅपटॉप हा जगातील दुर्मिळ वस्तु पैकी एक आहे. या लॅपटॉपचे 60 लाख रुपये अपेक्षित आहेत. असे 'आरआर ऑक्शन'चे प्रवक्ता बॉबी लिविंगस्टोन यांनी एका वृत्तसंस्थेला सांग‍ितले.

जॉन ग्लेन हे नासाच्या STS-95 मिशनव असताना त्यांनी स्पेस स्टेशनवरून बिल क्लिंटन यांना ई- मेल पाठवला होता. विशेष म्हणजे क्लिंटन यांनी जॉन यांच्या ई- मेलला प्रतिसादही दिला होता. दोन्ही इमेल लॅपटॉपमधील एक्सर्टनल हार्ड डिस्कमध्ये सेव्ह आहे. लॅपटॉपसोबत एक्सटर्नल हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क आणि पॉवर कॉर्ड्‍स अजूनही सुस्तितीत आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, अनोख्या लॅपटॉपची छायाचित्रे...