आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी भाषा येत नसल्‍याने, मी मूर्खच : बिल गेट्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन-गरीब असो वा श्रीमंत व्यक्ती. त्यांच्या आयुष्यात काहीतरी न केल्याची खंत असतेच. जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय व्यक्ती बिल गेट्स यांचीही सामान्यांप्रमाणेच एक खंत आहे. ती म्हणजे इंग्रजी वगळता अन्य कोणतीही भाषा न शिकल्याची. बुधवारी रात्री बिल गेट्स यांनी रेडडिट या सोशल नेटवर्किंग साइटवरून लोकांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘आस्क मी एनिथिंग’या सदरात त्यांनी युजर्सच्या अनेक प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
* भाषा शिकण्यासाठी काही प्रयत्न करत आहात काय?
होय. प्रयत्न सुरू आहेत. फ्रेंच, अरबी किंवा चिनी यांच्यापैकी एखादी भाषा शिकण्यासाठी वेळ काढण्याची इच्छा आहे. फ्रेंच सोपी भाषा असल्यामुळे कदाचित तीच शिकेल. एकदा ड्यूलिंगो अॅप्लिकेशनच्या माध्यमातून भाषा शिकण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही.
* तुम्हाला काय बनायचे होते?
मला खरे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात (कृत्रिम बुद्धिमत्ता) संशोधक व्हायचे होते.
* तुम्ही इतके श्रीमंत आहात. मग, तुम्ही ब्रँडेड वस्तू विकत घेता की साधारण वस्तूंनीही काम भागवून घेता?
खानपान आणि कपड्यांच्या बाबतीत मी खूप सामान्य आहे. मात्र, मी स्वत: विमान चालवत जगभर फिरावे, अशी शालेय दिवसांपासूनच इच्छा आहे. टेनिस खेळायला आवडते.
* जीवनातून तुम्ही काय धडा घेतला?
पुस्तक कितीही रोचक असले तरी त्यासाठी रात्रभर जागू नये. त्यामुळे दुसऱ्या दिवशी जागरणाचा त्रास होतो. मी याच समस्येवरील उपाय शोधतोय.
* तंदूर बनवताना त्यावर सॉस लावता की त्यात मसाला टाकता?
खूप सॉस लावतो. परंतु नेहमीच ते सांडवून देतो. टीव्ही कार्यक्रमात व्यंजन बनवायचे असते तेव्हा तंदूर बनवण्याचे टाळतोच. मला सॉस लावता येत नाही, असे लोकांना वाटेल याची भीती वाटते.
* आयुष्यात एखादी गोष्ट पूर्ण केल्याची वा राहिल्याची तुम्हालाही खंत वाटते काय?
होय..कधीकधी मी मूर्ख असल्याची जाणीव होते. मला एकही विदेशी भाषा अवगत नाही. शाळेत मी लॅटिन व ग्रीक भाषा शिकलो. त्यात ए ग्रेडही मिळाला. फ्रेंच, अरबी किंवा चिनी भाषा आल्या असत्या तर बरे झाले असते. मार्क झुकेरबर्ग कशी फाडफाड चिनी बोलतो. चीनमधील विद्यार्थ्यांशी त्याने साधलेला संवाद विलक्षण होता.