वॉशिंग्टन -
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स जगभरात मलेरिया निर्मूलनासह इतर संसर्गजन्य आजारांविरुद्ध लढण्यासाठी ५० कोटी डॉलर दान स्वरूपात देणार आहेत. ही घोषणा त्यांनी नुकतीच केली. विशेषत: जगातील विकसनशील देशांमध्ये संसर्गजन्य आजारांचे प्रमाण अधिक असून त्याविरुद्ध कठोर लढा देण्याची गरज गेट्स यांनी प्रतिपादीत केली.
रविवारी अमेरिकन सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसन अँड हायजिन या संस्थेच्या ६३ व्या सर्वसाधारण सभेत बोलताना गेट्स म्हणाले, ‘विकसनशील देशांमध्ये मलेरिया, न्यूमोनिया यांसारख्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी बिल गेट्स फाऊंडेशन २०१४ मध्ये ५० कोटी डॉलर दान करेल.’