आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bill Gates Reclaims Top Of Forbes Billionaire List

बिल गेट्स सर्वाधिक श्रीमंत; \'फोर्ब्स\'च्या यादीत मुकेश अंबानींसह 70 भारतीय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- 'मायक्रोसॉफ्ट'चे सह-संस्थापक बिल गेट्स यांना जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तिचा बहुमान पुन्हा एकदा मिळाला आहे. 'फोर्ब्स' मासिकाने नुकतीच जागतिक श्रीमंत व्यक्तिंची यादी जाहीर केली आहे. या यादीत बिल गेट्‍स अव्वल स्थानी आहेत. यादीत रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यासह 70 भारतीय अब्जाधिशांना स्थान मिळाले आहे.

बिल गेट्स यांच्या संपत्तीत 9 अब्ज डॉलरने (जवळपास 558.36 अब्ज रुपये) वाढ होऊन ती 76 अब्ज डॉलरवर (जवळपास 4,715.04 अब्ज रुपये) पोहोचली आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे 18.6 अब्ज डॉलर (जवळपास 1,153.94 अब्ज रुपये) संपत्ती आहे. जागतिक श्रीमंताच्या यादीत मुकेश अंबानी 40 व्या स्थानावर आहे. याशिवाय अनिल अंबानी पाच अब्ज डॉलर (जवळपास 310.20 अब्ज रुपये) संपत्तीचे मालक आहेत. यादीत 281 व्या क्रमांकावर अनिल अंबानींचे नाव आहे.

आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष लक्ष्मी मित्तल- 16.7 अब्ज डॉलर (1036.07 अब्ज रुपये), विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी- 15.3 अब्ज डॉलर (949.21 अब्ज रुपये), सन फार्माचे दिलीप संघवी- 12.8 अब्ज डॉलर (794.11 अब्ज रुपये) हे प्रत्येकी 52, 61 आणि 82व्या स्थानावर आहेत. याशियाय एचसीएलचे सह-संस्थापक शिव नडार (11.1 अब्ज डॉलर), हिंदुजा बंधु (10 अब्ज डॉलर), बिर्ला समुहाचे प्रमुख कुमार मंगलम (7 अब्ज डॉलर) यांचाही यादीत जागतिक श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत समावेश आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, अमेरिकन अब्जाधिशांचे वर्चस्व..