आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सगळेच काही शाळेत शिकता येत नाही : बिल गेट्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगणकसम्राट बिल गेट्स यांनी एकदा एका शाळेत भाषण दिले होते. अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या शाळेत शिकवल्या जात नाहीत? असा प्रश्न त्यांनी त्या वेळी विचारला. फील गुडचा संस्कार व राजकीय दृष्टीने योग्य ठरवलेले शिक्षण विद्यार्थ्यांना वास्तव जीवनाचा परिचय करून देत नाही. या वास्तव शिक्षणाच्या अभावामुळे ही मुले जीवनात यशस्वी होत नाहीत. बिल गेट्स यांनी सांगितलेल्या युक्तीच्या गोष्टी..

नियम 1 - जीवन अनुकूल नाही. त्याच्या प्रवाहानुसार जगा.

नियम 2 जगाला तुमच्या सन्मानाची अजिबात चिंता नाही. जगाला हे अपेक्षित आहे की तुमच्याबद्दल एक चांगली भावना असावी. त्याहीअगोदर तुम्ही एखादे काम करून दाखवा.नियम 3 शाळेतून बाहेर पडल्यावर लगेच तुम्ही हजारो रुपये कमवू शकत नाही. जोवर तुम्ही कमवत नाही तोवर मोटार व फोन घेऊ शकत नाही.

नियम 4-तुमचे शिक्षक कडक आहेत असे जर वाटत असेल तर तुम्ही तुमच्या बॉसची वाट पाहा.

नियम 5-तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर ती चूक तुमच्या पालकांची नाही. स्वत:च्या चुकीवर रडत बसण्यापेक्षा त्याकडून काही शिका.

नियम 6 - तुमच्या सान्निध्यात येण्यापूर्वी तुमचे पालक इतके वैतागलेले कधीच नव्हते. तुमची बडबड ऐकून ऐकून त्यांची अवस्था अशी झाली आहे. तुम्ही स्वत:ला सुधारणे योग्य ठरेल.

नियम 7 शाळेत भले तुमची हार-जीत होत असेल, पण प्रत्यक्ष जीवनात ती होत नाही. काही शाळांनी नापास पद्धत बंद केली आहे. वास्तविक जीवनाशी याचा कसलाच संबंध नाही.

नियम 8- परीक्षांतील सेमिस्टरप्रमाणे जीवन नाही. यात सुट्या नाहीत. तुम्हाला तुमची खरी ओळख प्राप्त करून देण्याची संधी फार कमी लोक देतात. तुम्ही काम वेळेवर करणे हेच योग्य होय.

नियम 9 टीव्हीचा वास्तव जीवनाशी संबंध नाही. खर्‍या जीवनात लोकांना कॉफी श्ॉापमधील मस्त वातावरण सोडून ऑफिसमध्ये जावे लागते.

नियम 10 - चांगले, बुद्धिमान व एकनिष्ठ बना.

नियम 11 - धूम्रपान करण्याने तुम्ही कूल दिसणार नाही. त्याऐवजी तुम्ही कमजोर बुद्धीचे वाटता. तुम्ही जेव्हा पुढच्या वेळी कुठे बाहेर जाल तेव्हा कदाचित एखादा अकरा वर्षांचा मुलगा तोंडात एखादे खेळणे घेतलेला दिसेल. तुम्हीही अगदी तसेच दिसाल, पण तुमचे वय 20 असेल. त्या अकरा वर्षांच्या मुलाकडे पाहून तुमच्या मनात जे विचार येतात तेच विचार तुम्ही धूम्रपान करताना पाहून लोकांच्या मनात येतील.

कन्स्ट्रक्शनिझम या थिअरीच्या आधारेही काही लोक शिकतात, पण यात काही अर्थ नाही, असे बिल गेट्स सांगतात. अर्थात ही गोष्ट समजून घेताना तिचे संदर्भ मुळापासून समजून घेतले पाहिजेत. यासाठी प्रथम इन्स्ट्रक्शनल थिअरी समजून घेऊया.

जी गोष्ट विद्यार्थ्याच्या मनावर ठसेल अशी गोष्ट शिक्षक अथवा एखाद्या वर्कशीटच्या मार्फत त्याला समजावली पाहिजे. ही गोष्ट विद्यार्थ्याच्या मनावर ठासून बसवण्यासाठी ती गोष्ट त्याला पुन्हा पुन्हा सांगितली पाहिजे. दोन अधिक दोन आणि दोन गुणिले दोन या दोन्ही पद्धतीत उत्तर चारच येते. यात थिअरी ऑफ इन्स्ट्रक्शन महत्त्वाचे आहे. पण शून्याची ताकद काय हे वेगळ्या पद्धतीने समजावले पाहिजे. शिकवणे हे कायम चालूच असते. काही जणांना शिक्षकाच्या लेक्चरमधून समजते. पण शिक्षकाच्या शब्दांशी विद्यार्थी कशा पद्धतीने जोडला जातो ही गोष्ट वेगळीच आहे.

यापेक्षा ही गोष्ट चांगली की, त्या विद्यार्थ्याला काही प्रात्यक्षिक करायला सांगा, तेव्हाच खरे चित्र समोर येईल. तरीही शालेय वर्गाचे सत्य काही वेगळे असते. चांगला शिक्षक योग्य काय यावरच भर देतो. प्रत्येक विषयावर साध्या पद्धतीने बोलायला त्याला आवडते. तुमच्या प्रत्यक्ष करण्यातून अनुभव घ्या आणि शिका, असे त्या शिक्षकाला तुमच्यावर बिंबवायचे असते. लर्निंग थिअरी ती हीच होय.