आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल गेट्सची मायक्रोसॉफ्टमधील मालकी संपणार, 33 कोटींचे शेअर शिल्लक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- बिल गेट्स यांची मायक्रोसॉफ्टवर असणारी मालकी 2018 पर्यंत संपुष्टात येणार आहे. सुमारे दहा वर्षांपासून बिल गेट्स हे प्रत्येक तिमाहीला त्यांच्याकडे असणा-या शेअरपैकी दोन कोटींच्या शेअर्सची विक्री करत आहेत. अशाप्रकारे ते स्वतःच कंपनीमधून स्वतःची भागीदारी कमी करत आहेत. योग्य प्रकारे नियोजन करून त्यांनी सुरुवातीपासूनच शेअर्सची विक्री सुरू ठेवली आहे. गेल्या 12 वर्षांत त्यांनी बहुतांश शेअर्सची विक्री केली आहे.

या सर्वामुळे गेट्स यांच्याकडे केवळ सुमारे 33 कोटी रुपयांचेच शेअर्स शिल्लक आहेत. तर कंपनीचे माजी अध्यक्ष स्टीव्ह बामर यांच्याकडे 33 कोटी 30 लाख शेअर्स आहेत. म्हणजेच त्यांच्याकडे सध्या गेट्स यांच्यापेक्षाही अधिक शेअर्स आहेत.

गेट्स मायक्रोसॉफ्टचे माजी अध्यक्ष आणि सहसंस्थापक आहेत. त्यांनी 1975 मध्ये त्यांचा शाळेतील मित्र पॉल एलन याच्या सहकार्याने कंपनीची सुरुवात केली होती. 2000 साली त्यांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद सोडले होते. त्यावेळी स्टीव्ह बामेर हे मायक्रोसॉफ्टचे सीईओ बनले होते. तर गेट्स यांनी कंपनीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. सध्या सत्या नाडेला हे कंपनीचे सीईओ आहेत. तर गेट्स संचालकीय मंडळामध्ये त्यांचे सल्लागार म्हणून काम पाहत आहेत.