आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bill Heffernan Smuggles Replica Pipe Bomb Into Parliament

मत पटवून देण्यासाठी संसदेत नेला बॉम्ब, ऑस्ट्रेलियन खासदार बिल हेफर्नन यांची शक्कल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - ऑस्ट्रेलियाच्या संसदेत सोमवारी एका ज्येष्ठ सिनेटरने पाइप बॉम्ब आणल्याने सभागृहातील सदस्य चांगलेच हादरले. सुरक्षाविषयक नवीन कायदा सुरक्षेच्या दृष्टीने तोकडा आहे, असे आपले मत ठासून सांगण्यासाठी या महाशयांनी हा भयंकर मार्ग निवडला होता.
सिनेटर बिल हेफर्नन असे बॉम्ब आणणार्‍या सदस्याचे नाव आहे. ते सत्ताधारी लिबरल पार्टीचे प्रतिनिधित्व करतात. तुम्हाला जे करावे वाटेल ते तुम्ही बिनधोकपणे करू शकता, असे म्हणत समितीच्या बैठकीत बिल यांनी डायनामाइटच्या काही कांड्या देखील उंचावून दाखवल्या. लहानपणी लोक अमोनियम नायट्रेट, डिस्टिलेट, डिस्टिलेट ( ग्लिसरीन आणि नायट्रेटपासून तयार करण्यात आलेला स्फोटक पदार्थ ) या मिर्शणाचा अडसर ठरणार्‍या झाडांना पाडण्यासाठी वापर केला जात होता, परंतु आता मात्र हे साहित्य कोणीही आणू शकते. त्यांना कोणीही रोखू शकत नाही, असे बिल यांनी सांगितले. 1996 मध्ये बिल पहिल्यांदा सिनेटचे सदस्य बनले.
सुरक्षिततेची हमी नाही
नवीन कायदा पुरेशी सुरक्षा देतो, असे मला वाटत नाही. या कायद्यात अनेक त्रुटी आहेत. हेच दाखवण्यासाठी मी सभागृहात हे साहित्य घेऊन आलोय. सुरक्षा कडक असती तर मला आत प्रवेश मिळाला असता का ? असा सवाल करून कायद्यातील दोषाकडे बिल यांनी सदस्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

कोणीही या अन्..
पासच्या आधारे कोणत्याही व्यक्तीला संसदेत प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे. एवढेच नव्हे तर पुढारी आणि त्यांच्यासोबतच्या लोकांनाही प्रवेशाची परवानगी दिली जाते. अर्थात कोणीही खुशाल या, हे धोरण माझ्या दृष्टीने सुरक्षिततेच्या पातळीवर योग्य नाही.