कॅलिफोर्निया -
फेसबुकने या आठवड्यात आपले मागील कमाईचे आकडे मागे टाकून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कंपनीने
गुगल संस्थापक लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन यांना मागे टाकले आहे. अर्थात फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत एकने पुढे सरकला आहे. मार्ककडे सध्या 331 कोटी डॉलर इतकी संपत्ती आहे. यामुळेच त्याला फोर्ब्सने आपल्या अब्जाधीशांच्या यादीत 16 वा क्रमांक दिला आहे. हॉर्वर्ड विद्यापीठातील अभ्यासक्रम मधेच सोडून मार्कने छोट्याशा एका खोलीपासून फेसबुकची सुरूवात केली. तो आपल्या दातृत्वासाठी प्रसिध्द आहे. कामाच्या व्यापातून आपल्यासाठी मार्क वेळ काढत असतो आणि जीवनाचा पूरेपूर आनंद लुटतो.