आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवाळाच्या जैविक इंधनातून जगाची ऊर्जा गरज भागणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - शेवाळापासून तयार केल्या जाऊ शकणार्‍या जैविक इंधनातून जगातील ऊर्जेची गरज भागवता येऊ शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. उथाह स्टेट युनिव्हर्सिटी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी जेफ मुडी यांनी सांगितले की, शेवाळापासून इंधन निर्मितीशी निगडित जैविक पदार्थ मुबलक प्रमाणात तयार होऊ शकतात. या जैविक पदार्थाची तुलना अन्य खाद्य पदार्थाशी होऊ शकत नाही.
सध्या अस्तित्वात असलेल्या साहित्याला छेद देण्याचा आमचा उद्देश नाही. मात्र, शेवाळापासून अधिक योग्य, वास्तववादी जैविक पदार्थ तयार करण्याचा उद्देश आहे, असे मुडी म्हणाले. मुडी यांचे सहकारी ख्रिस मॅकगिन्टी आणि जॅकसन क्वीन यांनी मोठ्या प्रमाणात आऊटडोअर सूक्ष्म शेवाळ मॉडेल विकसित केले. जगभरातील 4 हजार 388 ठिकाणांचा हवामानाच्या माहितीवर आधारित डाटा एकत्र करून सूक्ष्म शेवाळ उत्पादनाची शक्यता तपासण्यात आल्याचे पीएचवायएस डॉट ओआरजीच्या वृत्तात म्हटले आहे.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, कुठे करता येईल शेवाळाची निर्मीती....