आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Among Six Foreign Parties Authorised For NSA Surveillance

अमेरिकेने एनएसएला सोपवली भाजप आणि भारत सरकारच्या हेरगिरीची जबाबदारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉश्गिंटन - भारतात विक्रमी बहुमत प्राप्त करुन सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षची हेरगिरी करण्याचे अधिकार अमेरिकेने त्यांची गुप्तहेर संस्था नॅशनल सेक्यूरिटी एजन्सीला (एनएसए) दिले आहेत. ही माहिती एनएसएचे माजी कंत्राटदार आणि आता व्हिसलब्लोअर झालेले अॅडवर्ड स्नोडेन यांनी दिली आहे.
अमेरिकेत इतर देशांच्या सहा राजकीय पक्षांची यादी तयार करण्यात आली आहे. या पक्षांवर नजर ठेवण्याचे एनएसएला अधिकार देण्यात आले आहेत. या सहा पक्षांमध्ये भाजपचा देखील समावेश आहे. स्नोडेनने सोमवारी 'वॉश्गिंटन पोस्ट'च्या माध्यमातून ही माहिती सार्वजनिक केली आहे. त्यानुसार, अमेरिकेच्या वादग्रस्त फॉरेन इं‍टेलिजेंस सर्व्हेलान्स अॅक्‍ट (एफआयएसएस) नुसार एनएसएला हे अधिकार देण्यात आले आहेत. एनएसएला जी यादी सुपूर्द करण्यात आली आहे, त्यात केवळ सहा देशांच्या राजकीय पक्षांची यादी नसून त्यात, भारतासह देशांच्या सरकारांचीही नावे आहेत.
वॉश्गिंटन पोस्ट मधील वृत्तानुसार, केवळ चार देशांना अमेरिकेने हेरगिरीतून वगळले आहे. त्यात युनायडेट किंगडम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे. अमेरिकेसह या चार देशांना फाइव्ह आयज नावाने ओळखले जाते. या चार देशांसोबत अमेरिकेने हेरगिरी न करण्याचा करार केला आहे.

(छायाचित्र - वॉश्गिंटन येथील यूएस कोर्ट हाऊसचे कारच्या आरशातील दृष्य )