आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णविवराच्या भिंतीशी पृथ्वीचे सातत्याने घर्षण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - कृष्णविवराच्या विशाल भिंतीशी पृथ्वीचे सातत्याने घर्षण होत असून त्यामुळे बिग बँगनंतर ब्रह्मांडाच्या भोवती दाबाचे आवरण निर्माण झाले, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. अस्तित्वात असलेल्या एकूण विवरांपैकी 86 टक्के कृष्णविवराचा भाग अदृश्य असून तो प्रामुख्याने गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून ब्रह्मांडातील अन्य सामान्य पदार्थांशी देवाणघेवाण करत असतो, असे अंतराळातील घटनांच्या निरीक्षणावरून ध्वनित झाले आहे.

निष्क्रिय झालेल्या पदार्थांच्या विशालकाय कणांपासून कृष्णविवराची निर्मिती झाली असा जगन्मान्य सिद्धांत आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांच्या शोधमोहिमेनंतरही या दिशेने ठोस असे काही हाती लागू शकलेले नाही. संशोधनाच्या कक्षा व्यापक करण्याची आवश्यकता आहे. असे कॅनडातील व्हिक्टोरिया विद्यापीठाचे मॅक्झिम पॉस्पेलोव्ह यांनी म्हटले आहे.