आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णविवरे तर अन्य ब्रह्मांडांचे प्रवेशद्वार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- कृष्णविवरे इतर ब्रह्मांडांचे प्रवेशद्वार असल्याचा दावा करणारा नवीन सिद्धांत संशोधकांनी मांडला आहे. नवीन थिअरीमुळे खगोलशास्त्राच्या अभ्यासाला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उरुग्वे येथील विद्यापीठातील भौतिकशास्त्रज्ञ रोडॉल्फ गाम्बिनी आणि लुसियाना विद्यापीठाचे जॉर्ज पुलीन यांच्या संयुक्त अभ्यासात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आतापर्यंत भौतिकशास्त्रज्ञ विश्वाच्या उत्पत्तीला केवळ एक बिग बँग थिअरी कारणीभूत मानत होते. त्यावर विज्ञानाची वाटचाल सुरू होती. सामान्य सापेक्षता नियमातून या सिद्धांताचे विश्लेषण करता येत नाही, असे ‘फिजिक्स डॉट ऑर्ग’वरील शोधनिबंधात नमूद करण्यात आले आहे. ही थिअरी खरी ठरली तर कृष्णविवरामध्ये जाणाºया गोष्टींचा शोध घेणे शक्य होईल.

कसा केला अभ्यास?
संशोधनात गुरुत्वाकर्षणाच्या (एलक्यूजी) कड्याचे परिणाम जाणून घेण्यात आले. ते अनंत लांबीचे पाश अशा स्वरूपात असतात. त्याचा कृष्णविवराशी असलेला संबंध लक्षात घेण्यात आला. त्यातूनच ब्रह्मांडांचा वेध घेण्यात आला आहे.

भारतीय संशोधक
लूप क्वाँटम ग्रॅव्हिटी या थिअरीच्या अध्ययनासाठी असलेल्या प्रकल्पात भारतीय वंशाच्या अभय अष्टेकर यांच्या टीमने 2006 मध्ये काम केले होते.