आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Black Hole News In Marathi, Dhiraj R. Pasham, Divya Marathi

भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याने शोधले अत्यंत दुर्मिळ कृष्णविवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भारतीय वंशाच्या धीरज आर. पाशम या विद्यार्थ्याने अत्यंत दुर्मिळ अशा कृष्णविवराचा (ब्लॅक होल) शोध लावला आहे. 1970 मध्ये शास्त्रज्ञांनी असेच एक कृष्णविवर सापडल्याचा दावा केला होता. मात्र, त्याचा आकार आणि घनतेच्या निकषांवर ते सिद्ध होऊ शकले नव्हते.

अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने हा अत्यंत महत्त्वाचा शोध असल्याचे म्हटले आहे. ज्या कृष्णविवराचा धीरजने शोध लावला ते शोधणे अत्यंत कठीण असल्याचे या संस्थेने नमूद केले आहे. अशा प्रकारचे कृष्णविवर असते, याबद्दल आजवर शास्त्रज्ञांमध्येच मतभेद होते. या पार्श्वभूमीवर धीरजने लावलेला शोध अत्यंत महत्त्वाचा आहे.

आकाशगंगा एम-82 मध्ये हे मध्यम आकाराचे कृष्णविवर लपले असल्याचा दावा मेरिलँड विद्यापीठातील खगोलशास्त्राचा पदवीधर असलेला धीरज व त्याच्या दोन सहका-यांनी केला. पृथ्वीपासून त्याचे अंतर 1.20 कोटी प्रकाशवर्षे असून ‘नेचर’मध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. या कृष्णविवरात दोन तारे स्पष्ट दिसतात. त्यांना एक्स-41 व एक्स् -42 अशी नावे देण्यात आली आहेत.

सूर्यापेक्षा 400 पट द्रव्यमान : या कृष्णविवराचे द्रव्यमान सूर्यापेक्षा 400 पट अधिक असल्याचा धीरज याचा दावा आहे.