आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Black Money Information Exchange Important India Demand In G 20

काळ्या पैशाच्या माहितीची देवाणघेवाण गरजेची, जी-२० मध्ये भारताची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्तंबूल - परदेशातील बँकांमध्ये असलेल्या काळ्या पैशांचा आेघ रोखण्यासाठी माहितीच्या देवाणघेवाणीची स्वयंचलित यंत्रणा गरजेची आहे, अशी आग्रही मागणी भारताकडून करण्यात आली. तुर्कीच्या राजधानीत जी-२० देशांच्या शिखर बैठकीचा नुकताच समारोप झाला.
जी-२० सदस्य राष्ट्रांच्या अर्थमंत्र्यांची बैठक राजधानी इस्तंबूलमध्ये ९ व १० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. सर्व देशांनी परस्परांना बँकांचा तपशील देण्याची स्वयंचलित यंत्रणा उभारली पाहिजे, त्याचा फायदा काळ्या पैशाचा व्यवहार रोखण्यासाठी होऊ शकेल, असे अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी म्हटले आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील कोट्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.