आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Black Money Lot In Pakistan; Switzerland Bank Report

पाकिस्तानमध्ये ब्लॅक मनी जास्त; स्वित्झर्लंड बॅँकेचा अहवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झुरिच / नवी दिल्ली - स्विस बॅँकेत पैसा दडवण्यात पाकिस्तान भारतापेक्षा पुढे आहे. पाकिस्तानी नागरिक व संस्थांनी स्विस बॅँकेत 1 हजार 441 दशलक्ष स्विस फ्रॅँक(सुमारे 9,200 कोटी रुपये) ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीयांनी ठेवलेल्या पैशापेक्षा ही रक्कम दीडपट जास्त आहे. मात्र, स्वित्झर्लंडच्या सेंट्रल बॅँकेने 2002 पासून जमा केलेल्या आकडेवारीत ही रक्कम कमी आहे.


2005 मध्ये 3 अब्ज स्विस फ्रॅँक, तर 2010 मध्ये 1.95 अब्ज स्विस फ्रॅँक विदेशी निधी जमा असल्याचे दिसून आले. पाकिस्तानी नागरिक व संस्थांनी 31 डिसेंबर 2012 पर्यंत स्विस बॅँकांत 15000 कोटी पाकिस्तानी रुपये दडवल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वित्झर्लंड सेंट्रल बॅँकेच्या वार्षिक अहवालात पाकिस्तानी नागरिकांनी 2011 अखेरीस 23 हजार पाकिस्तानी रुपये दडवल्याचे नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये मावळत्या सरकारमधील काही नेत्यांनी स्विस बॅँकांमध्ये काळा पैसा दडवून ठेवण्याचा आरोप होत आहे.
1.44 अब्ज स्विस फ्रॅँकमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी 1170 दशलक्ष स्विस फ्रॅँक(743 कोटी 10 लाख रुपये) वैयक्तिक स्वरूपात तर 271 दशलक्ष फ्रॅँक मालमत्ता व्यवस्थापकांमार्पत जमा करण्यात आले. 2011 मध्ये पाकिस्तानी नागरिकांनी स्विस बॅँकेत 1764 दशलक्ष स्विस फ्रॅँक थेट जमा केले होते. वित्त व्यवस्थापन संस्थांकडून 355 दशलक्ष फ्रॅँक जमा करण्यात आले होते. भारतीयांनी 2011 मध्ये जमा केलेल्या 2,183 स्विस फ्रॅँक रकमेच्या तुलनेत 2012 मध्ये त्यात घट आली.
काळ्या पैशाचा मुद्दा चर्चेत
पाकिस्तानची लोकसंख्या व क्षेत्रफळ भारतापेक्षा कमी असतानादेखील तेथील नागरिक व संस्थांचा स्विस बॅँकेत वाटा जास्त असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय नागरिकापेक्षा पाकिस्तानी नागरिकाचा स्विस बॅँकेत दीड टक्का पैसा जास्त आहे. 2012 अखेरीस स्विस बॅँकेत पाकिस्तानचा 9,100 कोटी रुपये पैसा होता, असे स्विस नॅशनल बॅँकेने म्हटले आहे.