आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blackberry Refuses , To Hand Over Data, Memogate, Pakistan

मेमोगेट प्रकरणातील झरदारींनी पाठविलेली माहिती देण्यास 'ब्लॅकबेरी'चा नकार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी मेमोगेट प्रकरणातील पाठविलेली कोणतीही माहिती देण्यास ब्लॅकबेरी बनविणारी कंपनी रिसर्च इन मोशनने (रिम) नकार दिला आहे. झरदारी यांनी त्या मेमोत पाकिस्तानात लष्कराने बंड केल्यास अमेरिकेने मदत करावी, अशी विनंती केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मात्र, पाकिस्तानमधील जिओ वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ब्लॅकबेरीने (रिम) यासंबंधातील कोणतेही माहिती सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे. याआधी अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत हुसेन हक्कानी यांचा याप्रकरणी बळी दिला गेला आहे. लष्कर व सरकार यांच्यात झालेल्या वादामुळे राजदूत हक्कानी यांना राजीनामा द्यावा लागला होता.
कॅनडाची कंपनी रिमने याबाबत बोलताना सांगितले की, आम्ही कोणत्याही ग्राहकाची माहिती त्यांनी सांगितल्याशिवाय कोणालाही देऊ शकत नाही. त्यामुळे पाकिस्तानमधील कोणत्याही घटकाला याची माहिती देण्यात येणार नाही.
पाकिस्तानी अमेरिकेन उद्योगपती मंसूर इजाज यांनी ही माहिती अमेरिकेचे संरक्षणप्रमुख जनरल माइक मुलेन यांच्याकडे पोहोचवली होती. लादेन यांची हत्या झाल्यानंतर काही दिवसात हे प्रकरण घडल्याचे सांगण्यात येत आहे.
रिमने याबाबत सांगितले की, पाकिस्तानमधील अटोर्नी जनरल यांनी याबाबत माहिती मागितली होती. मात्र त्यांना बंद पाकीटाद्वारे माहिती देण्यास नकार दिल्याचे पत्र पाठविले आहे. दरम्यान, आजपासून मेमोगेट प्रकरणी बलूचिस्तान हायकोर्टात मुख्य न्यायाधिश काझी फैयाज इसा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंडपीठाची सुनावणी सुरु झाली आहे. अटॉर्नी जनरल मौलवी अनवारुल हक यांनी सोमवारी ब्रिटनमधील पाकिस्तानी उच्चायोगाला आदेश दिला आहे की, मंसूर इजाज यांनी व्हिजासाठी अर्ज करताच त्यांना तत्काळ व्हिजा देण्यात यावा. मात्र इजाज यांनी आपल्याला व कुटुंबियांना धमकीचे फोन येत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मला पाकिस्तानात येण्यास २५ जानेवारीपर्यंत वेळ मिळावा, अशी विनंती केली आहे. दरम्यान यामागेही काहीतरी राजकीय षडयंत्र असावे, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
झरदारी-कयानी यांच्यात पॅचअप? तणाव निवळणार
पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झरदारी यांची फाइल स्वत:चाच पक्ष उघडणार!
सरकार व लष्कर यांच्यात ताण-तणाव मला नको आहे- झरदारी