आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘ब्लेड रनर’ने चोर समजून प्रेयसीवर झाडल्या गोळ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्सबर्ग - तो दोन्ही पायांनी पंगू आहे, पण कार्बन फायबरच्या ब्लेडवर तो वा-याशी स्पर्धा करत धावतो.या जिद्दीमुळे प्रकाशझोतात आलेला ऑस्कर प्रिस्टोरियस गुरुवारी व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर मात्र भयंकर थरारामुळे चर्चेत आला. परस्परांबद्दलच्या प्रेमाला व्यक्त करण्याच्या या क्षणी प्रिस्टोरियसने चक्क प्रेयसी रीवा स्टिनकॅम्पवर चार गोळ्या डागल्या आणि ती गतप्राण झाली. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार चोर समजून या धावपटूने तिच्या दिशेने गोळीबार केला.

पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या या ‘ब्लेड रनर’ला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.दक्षिण आफ्रिकेच्या या धावपटूने लंडनच्या ऑ लिम्पिकमध्ये 400 मीटर स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. जोहान्सबर्गच्या ‘टॉक रेडिओ 702’नुसार प्रिस्टोरियसने मारलेली एक गोळी प्रेयसीच्या डोक्यात लागली आणि दुसरी खांद्याला छेद करून गेली. आपल्या घरात अचानक कुणी चोर घुसला असल्याचे समजून त्याने हा गोळीबार केला असावा, अशी शक्यता वर्तवली जात असली तरी या घटनेमागील नेमक्या कारणाचा पोलिस शोध घेत आहेत.पोलिस प्रवक्ते केटलॅगो मोगाले यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरून एक 9 एमएम पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. मृत महिलेवर चार गोळ्या झाडण्यात आल्या. या दुर्घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला.

रीवा स्टिनकॅम्प : प्रिस्टोरियसची ही प्रेयसी असलेली 33 वर्षीय रीवा प्रसिद्ध मॉडेल आणि टीव्ही स्टार होती. कायद्याची पदवी संपादन केल्यानंतर तिने मॉडेल म्हणून करिअर केले.

कोण हा ऑस्कर प्रिस्टोरियस?
* ब्लेड रनर नावाने प्रसिद्ध असलेला प्रिस्टोरियस हा ऑ लिम्पिक स्पर्धेत भाग घेणारा पहिला अपंग धावपटू.
* पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत त्याने 4 बाय 400 मीटर रिले स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तेव्हा तो चर्चेत आला होता.
* एक वर्षाचा असतानाच गुडघ्याखाली त्याचे दोन्ही पाय निकामी झाल्यावर कार्बन फायबरच्या ब्लेडआधारे तो धावण्याच्या शर्यतीत धावत होता.
* गेल्या वर्षी ‘टाइम’ने जाहीर केलेल्या यादीत त्याला जगातील पहिल्या 100 सर्वांत प्रभावी व्यक्तींमध्ये निवडले होते.