आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blast At Shia Mosque Blast At Shikarpur In Pakistan

पाकिस्तान:सिंध प्रांतात नमाजच्यावेळी मशिदीत आत्मघाती स्फोट, 49 जण ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिकारपुर- पाकिस्तानातील सिंध प्रांतातील शिकारपुर जिल्ह्यात एका मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात 49 लोकांचा मृत्यू झाला आहे तर सुमारे 50 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. हा स्फोट नमाज पडल्यानंतर लगेच झाला. याबाबत सांगितले जात आहे की, स्फोटाची तीव्रता एवढी जोरदार होती मशिदीच्या भिंती पडल्या आहेत. याचबरोबर मशिदीत आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. पोलिसांनी हा आत्मघाती हल्ला असल्याचे म्हटले आहे.
शिकारपुर जिल्ह्यात एसएसपी साकिब इस्माइल यांनी स्थानिक मीडिया घटनेत मारल्या गेलेल्या लोकांची माहिती देताना सांगितले की, सर्व जखमींना सरकारी रूग्णालयात दाखल केले आहे. दुसरीकडे, धार्मिक राजकीय संघटना मजलिस वाहदातुल मुसलीमीन याचा नेता अलामा मोहम्मद अमीन शाहीदी यांनी या घटनेबबात सरकारला जबाबदार धरले असून सरकारच्या नाकर्तेपणामुळे अशा घटना घडत असल्याचे म्हटले आहे. तसेच या भागात तीन दिवसाचा दुखावटा जाहीर केला आहे. हा हल्ला अशावेळी घडवून आणला जेव्हा पाकिस्तान देश दहशतवादाला मूळापासून संपविण्यासाठी नॅशनल एक्शन प्लान लागू करण्याच्या तयारीत आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी या घटनेचा निषेध केला आहे. सिंध प्रांतातील माहिती मंत्री शरजील इनाम मेमन यांनी म्हटले आहे की, शिकारपुर आणि आसपासच्या सर्व रूग्णालयात आपतकालीन स्थिती घोषित करण्यात आली आहे. घटनास्थळी रेस्क्यू टीमने आपले काम सुरू केले आहे.
शिया-सुन्नी मुसलमानांत होतो संघर्ष-
पोलिस आणि पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी अंदाज बांधला आहे की हा हल्ला सुन्नी मुस्लिमांनी केला असावा. कारण ही मशिदीत शिया लोक येतात. दोन्ही समुदायात या भागात याआधीही संघर्ष झालेला आहे. दरम्यान, आतापर्यंत या हल्ल्याची कोणीही जबाबदारी स्वीकारली नाही. तसेच अधिकृतपणे सरकारनेही कोणाला जबाबदार धरले नाही.
पुढे वाचा, बॉम्बस्फोटातील छायाचित्रे....