आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापेशावर - पाकच्या पेशावर शहरात रविवारी ऐतिहासिक चर्चवर झालेल्या दुहेरी आत्मघाती हल्ल्यात 78 लोक मारले गेले. यात 7 मुले, 30 महिला व दोन पोलिसांचा समावेश आहे. 130 हून अधिक जखमी आहेत. तहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेच्या जनदुल्लाह गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
पोलिस आयुक्त साहिबजादा मुहम्मद अनिस यांनी सांगितले, रविवारी प्रार्थनेनंतर ख्रिस्ती बांधव बाहेर येत असताना दोन हल्लेखोर 30 सेकंदात गर्दीजवळ पोहोचले. दोघांनीही स्वत:ला उडवून दिले. या वेळी सुमारे 700 लोक चर्च परिसरात होते. स्फोट इतका भीषण होता की अनेक इमारतींचे नुकसान झाले. दोन्ही हल्लेखोरांच्या जॅकेटमध्ये प्रत्येकी सुमारे 6 किलो स्फोटके ठासून भरलेला होती, असे बॉम्बनाशक पथकाचे शफाकत मोहंमद यांनी सांगितले.
ड्रोन हल्ल्याचा बदला जनदुल्लाह गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अमेरिकी ड्रोन हल्ल्याचा बदला घेण्यासाठी स्फोट घडवल्याचे स्पष्ट करून प्रवक्ता अहमद मारवत याने ‘न्यूजवीक’शी बोलताना सांगितले, ड्रोन हल्ले थांबत नाहीत तोवर हल्ले सुरूच राहतील.
भीषण हल्ला : ख्रिस्ती बांधवांवरील हा सर्वांत भीषण हल्ला आहे. लाहोरमध्ये गेल्या मार्चमध्ये 2 चर्चसह 100 घरे पेटवण्यात आली. मार्च 2002 मध्ये चर्चवरील हल्ल्यात तीन परदेशी मारले गेले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.