आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blast In Front Of American Consulate In Turki Kills Two

तुर्कीमध्‍ये अमेरिकन वकिलातीजवळ आत्‍मघातकी स्‍फोट, दोन ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंकारा- तुर्कीची राजधानी अंकारा येथे अमेरिकेच्या वकिलातीजवळ शुक्रवारी बाँबस्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटामध्ये दोन जणांचा मृत्‍यू झाल्‍याची माहिती आहे. हा आत्‍मघातकी हल्‍ला असून त्‍यात 25 जण जखमी झाले आहेत. स्‍फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्‍याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही. हल्‍लेखोरांनी अमेरिकेच्‍या वकिलातीला लक्ष्‍य केले आहे.

प्रत्‍यक्षदर्शींनी एका हल्‍लेखोराला वकिलातीमध्‍ये शिरण्‍याचा प्रयत्‍न करताना पाहिले. तो एका कारमध्‍ये होता. परंतु, वकिलातीपासून काही अंतरावरच कारचा स्‍फोट झाला. हल्‍लेखोर एकच होता की आणखी काही जणांचा समावेश होता, याबददल अद्याप माहिती नाही. मरण पावलेले दोन व्‍यक्ती वकिलातीचे सुरक्षा रक्षक असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा टाकला असून एखाद्या छावणीचेच स्‍वरुप प्राप्‍त झाले आहे.