आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेक्सासमध्ये ब्लास्ट: अनेक इमारती आगीच्या भक्ष्यस्थानी, 70 ठार- 200 जखमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक्सास- अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका फर्टिलायझर कंपनीत बुधवारी रात्री शक्तीशाली स्फोट झाला. यात 60 जणांचा मृत्यू झाला असून 200 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. स्फोट इतका भीषण आहे की, परिसरातील अनेक इमारती आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. तीन दिवसात अमेरिकेतील हा दुसरा ब्लास्ट आहे. सोमवारी बोस्‍टनमध्ये मॅरेथॉनमध्ये झालेल्या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता.

बोस्टन मॅरेथॉनदरम्यान झालेल्या बॉम्बस्टोट हा दहशतवादी हल्ला असल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेत झालेल्या 9/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतरचा सगळ्यात मोठा हल्ला होता. स्फोटाची चौकशी सुरु असून टेक्‍सासमधील फर्टिलायझर कंपनीत झालेल्या शक्तीशाली स्फोटाने अमेरिका पुन्हा एकदा हादरली आहे. स्फोट कशामुळे झाला याबाबत अद्याप कळू शकलेले नाही. स्फोट इतका भीषण होता की, कंपनीशेजारी असलेल्या एका नर्सग होमसह अनेक इमारती आगीच्या भक्ष्यस्थानी आहेत. कंपनीत अनेक कर्मचारी अडकले असून मृताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अग्निशमन दलाचे गाड्या, अँम्बुलन्स आणि सहा हेलीकॉप्टरच्या मदतीने आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.

टेक्‍सासमधील ब्लास्ट हा अमेरिकन वेळेनुसार मंगळवारी रात्री आठ वाजता झाला. फर्टिलायझर कंपनी शेजारी असलेले नर्सिंग होम पूर्णपणे उद्ध्‍वस्‍त झाले आहे. स्फोटाचा आवाज 10 किमी अंतरापर्यंत ऐकू आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. रेडक्रासचे प्रवक्ता अंतिया फ़ॉस्टर यांनी सांगितले की, स्थानीय अधिकार्‍यांसोबत रेडक्रासची टीमही मदत कार्यात सहभागी झाली आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... टेक्‍सासमध्ये स्फोटाच्या छायाचित्रे,