आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blast Near The Mukharjee's Hotel In Bangladesh ; Blast Only 50 Feet Away

मुखर्जींच्या हॉटेलबाहेर बांगलादेशात 50 फूट अंतरावर स्फोट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका - बांगलादेश दौ-यात राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी थांबलेल्या हॉटेलच्या इमारतीबाहेर 50 फुटांवर सोमवारी स्फोट झाला. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. दरम्यान, विरोधी पक्षांनी दिवसभर बंद पाळला. देशभरात हिंसाचारात 19 जण मारले गेले असून मृतांचा आकडा 80 झाला आहे.


राष्‍ट्रपतींचे सचिव विष्णू राजामणी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अत्यंत कमी क्षमतेचा स्फोट होता. त्यास बॉम्बस्फोटदेखील म्हणता येणार नाही. ढाक्यात भारतीय वकिलातीचे उच्चायुक्त संदीप चक्रवती यांनीही हा स्फोट बाजारपेठेत झाला असल्याचे सांगून राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी थांबलेल्या हॉटेलचा या घटनेशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.


स्फोट झाला तेव्हा मुखर्जी ढाका विद्यापीठात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. बांगालादेशचे राष्‍ट्रपती जिलूर रहेमान यांचीही कार्यक्रमात उपस्थिती होती. या वेळी विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ पार पडला.