कैरो - सिनाई प्रांतात रविवारी एका बस स्फोटात 3 जण ठार, तर 27 नागरिक जखमी झाले. प्रवासी गाडीमध्ये हा स्फोट झाला. ही घटना इस्रायली सीमेवर घडली. मृत प्रवाशांमध्ये दक्षिण कोरियाच्या दोन नागरिकांचा समावेश आहे. घटनेतील जखमींचा परिचय स्पष्ट होऊ शकलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. इस्रायलच्या बचाव पथकाकडून घटनास्थळी अँम्बुलन्स रवाना करण्यात आली. गेल्या वर्षी जुलैमध्ये कट्टरवाद्यांनी मोठय़ा संख्येने स्फोट घडवले होते.