आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blind Jihadist Taymullah Al Somali Fighting For Isis, Divya Marathi

अंध असूनही हा क्रूरकर्मा सीरियात जिहादच्या नावाने करतोय दहशतवादी कृत्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दमास्कस - सीरियाच्या सैन्याविरूध्‍द लढत असलेल्या एक अंध जिहादीची छायाचित्रे सध्या चर्चेत आहेत. तैमुल्लाह अल-सोमाली असे त्याचे नाव आहे. सीरियात आयएसआयएस दहशतवाद्यांच्या बाजूने तैमुल्ला लढत आहे. त्याने लोकांना जिहादमध्‍ये सहभागी होण्‍याचे आवाहन केले आहे.
कोणत्याही प्रकारचे अपंगत्व जिहादमध्‍ये सामील होण्‍यास अडथळा ठरत नाही, असे त्याने सां‍गितले आहे. डच नागरिक असलेला तैमुल्ला अल-सोमाली या वर्षाच्या सुरूवातीला अरबमध्‍ये आला होता. अनेक छायाचित्रांमध्‍ये तो आयएसआयएस दहशतवाद्यांबरोबर दिसला आहे.

सोमालियामध्‍ये तैमुल्लाचा जन्म झाला. सोशल मीडियाच्या माध्‍यमातून जगभरातील मुस्लिमांना आयएसआयएसमध्‍ये सहभागी होण्‍याचे तो आवाहन करत आहे.
अंध असूनही मी सीरियात आलो. माझे अपंगत्व त्यात अडथळा म्हणून आले नाही. त्यामुळे तुम्ही कोणतेही कारण देऊन नका, असे त्याने ट्विट केले आहे. नुकतेच ट्विटरवरील त्याची छायाचित्रे समोर आली आहेत. त्यात अल-सोमाली आयएसआयएस दहशतवाद्यांबरोबर दिसत आहे. त्याच्याबरोबर बेल्जियमचे दोन दहशतवादीही आहेत. एका छायाचित्रामध्‍ये तो अँटी एअरक्राफ्ट शस्त्रासोबत दिसतोय. दुस-या छायाचित्रात तो दहशतवाद्यांच्या समुहात उभा आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा ट्विटरवर शेअर करण्‍यात आलेली तैमुल्ला अल-सोमालीची छायाचित्रे....
(तैमुल्लाह अल-सोमाली:Image Source - Twitter)