आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Blind Man Thomas Graham Builds His Own Home, Inspires Local Community

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंध व्यक्तीने स्वत:च बांधले 3 खोल्यांचे घर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेतील एका जन्मजात अंध व्यक्तीने कुटुंबाकरिता स्क्रॅचपासून स्वत:च घर बांधण्याचा निश्चय केला आणि तो पूर्णत्वासही नेला.

डलासपासून 160 किलोमीटर अंतरावर असलेल्या बुलार्ड येथील 48 वर्षीय थॉमस ग्रॅहमने एप्रिलमध्ये घर बांधण्यास प्रारंभ केला. वेस्ट टेक्सासमधील त्याच्या बालपणीच्या घराच्या डिझाइनसारखेच याही घराचे डिझाइन आहे. बालपणापासूनच स्वत:चे घर बांधण्याचे मी स्वप्न पाहिले होते. त्यासाठी लाकूड आणि कॅबिनेटचा वापर करून छोटेमोठे प्रकल्प हाती घेऊन सराव केला. त्यानंतर आता घर बांधण्याची योग्य वेळ आली आहे, असा निर्णय मी घेतला, असे दृष्टी नसतानाही प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर स्वत:चे घर स्वत:च्या हाताने बांधण्याचे स्वप्न साकार करणार्‍या थॉमस ग्रॅहमने सांगितले.

थॉमस ग्रॅहमच्या या धडपडीने स्थानिक रियाल्टर (स्थावर संपत्तीचा दलाल) जिम मॅके यांच्यासह समाजातील अनेकांचे लक्ष वेधले. मॅके यांनी ग्रॅहमला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला. अनुभवी बांधकाम व्यावसायिक डेव्ह कोव्हाल्ट यांच्यासह विविध पाच चर्चच्या परिसरातील नामांकिताशी संपर्क साधला. त्यांनी ग्रॅहमला मुख्यत्वे छत चढवण्यासाठी मदत केली. उर्वरित काम मात्र ग्रॅहमने पत्नीने दिलेल्या साहित्याचा वापर करून स्वत:च बांधकाम केले. ग्रॅहमचे कुटुंब या वर्षीचा नाताळ या नवीन घरातच साजरा करणार आहे.