आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बो शिलाई यांचे जन्मठेपेच्या शिक्षेला आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे पदच्युत नेते बो शिलाई यांनी जन्मठेपेच्या शिक्षेला आव्हान दिले आहे. लाच स्वीकारणे व सत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणात पूर्व चीनमधील न्यायालयाने शिलाई यांना रविवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.


शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले होते. चीनच्या कायद्यानुसार, शिक्षेवर अंतिम शिक्कामोर्तब करणा-या न्यायालयाकडे शिलाई यांना आव्हान याचिका दाखल करता येऊ शकते. माओ समर्थक शिलाई विद्यमान राष्‍ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांच्या 2022 पर्यंतच्या कार्यकाळापर्यंत तुरुंगाबाहेर पडण्याची शक्यता कमीच आहे, असे राजकीय विश्लेषकांचे
मत आहे.