आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Boat Purchasing Pakistani Talking Of 26 11 Attack Offenders

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

26-11 मुंबई हल्ल्यातील आरोपींना बोट विकणा-या सहा पाकिस्तान्यांना न्यायालयाचे समन्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - 26-11 मुंबई हल्ल्यातील आरोपींना बोट विकणा-या सहा जणांना पाकिस्तानी दहशतवादविरोधी न्यायालयाने समन्स बजावले आहेत. हल्लेखोरांनी या सहा जणांकडून बोट, एक इंजिन आणि इतर साहित्य खरेदी केले होते. मुंबई हल्ला खटल्याचे कामकाज रावळपिंडीच्या अदीयाला तुरुंगात सुरू आहे. सुरक्षेच्या कारणावरून तुरुंगात बंद खोलीत न्यायाधीश हबीब उर रेहमान यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी हमझा बिन तारिक, मुहंमद अली, मोहंमद सैफुल्लाह, उमर दराज, साकीब इकबाल आणि अतिक अहमद यांना समन्स बजावण्यात आले. या लोकांनी आरोपींना बोट, एक इंजिन व सामग्री पुरवली होती, असे मुख्य सरकारी वकील चौधरी झुल्फिकार अली यांनी सांगितले. दरम्यान, भारतातील चार साक्षीदारांची उलटतपासणी करण्याची मागणी पाकिस्तानी न्यायालयीन आयोगाने भारताकडे केली आहे. त्याबद्दल भारताकडून उत्तर आले नसल्याचे वकिलांनी सांगितले.