आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी राष्ट्रपतिपदासाठी बॉबी जिंदाल यांची तयारी, 2015 मध्ये गव्हर्नर पदाचा कार्यकाळ संपणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - लुईझिएना प्रांताचे मूळ भारतीय गव्हर्नर बॉबी जिंदाल 2016 मधील अमेरिकी राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यांच्या रिपब्लिकन पार्टीचेच एक ज्येष्ठ सिनेटर डेव्हिड व्हिक्टर यांनी ही माहिती दिली. आहे. जिंदाल यांचा दुसरा कार्यकाळ 2015 मध्ये संपत आहे. त्यानंतर त्यांना गव्हर्नर होता येणार नाही. जिंदाल यांनीही यापूर्वी राष्ट्रपतिपदासाठी शर्यतीत असल्याचे नाकारले नव्हते. जानेवारीत यावर निर्णय होऊ शकेल, असे व्हिक्टर यांनी म्हटले आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना सिनेटर डेव्हिड व्हिटर म्हणाले की, जिंदाल हे या पदासाठी सर्वांत योग्य उमेदवार ठरतील असे मला वाटते. जिंदाल यांच्याबद्दल मला सुरुवातीपासूनच फार आदर आहे. त्यांनी जीवनात जी राजकीय मूल्ये जोपासली आहेत ती आदर करण्यासारखीच आहेत; पण व्यक्तिश: मी त्यांच्यासाठी काय करू शकेल किंवा करू शकणार याचा विचार केलेला नाही, असे व्हिटर यांनी म्हटले आहे. व्हिटर स्वत:देखील रिपब्लिकन पार्टीचेच सिनेटर आहेत. जिंदाल हे पुढचे राष्ट्रपती ठरतील काय, असे विचारले असता व्हिटर म्हणाले की, प्रत्येक सदस्यांसाठी ही शक्यता नाकारता येत नाही. मात्र जिंदाल यांच्यात ती पात्रता आहे.