आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boeing Airliner Crashes At San Francisco Airport

दक्षिण कोरियाच्‍या विमानाला अमेरिकेत अपघात; दोघांचा मृत्‍यू, अनेक जण बेपत्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन फ्रॅन्सिस्‍को- दक्षिण कोरियातील एशियाना एअरलाईन्‍सचे बोईंग 777 विमान सन फ्रॅन्सिस्‍को विमानतळावर उतरताना अपघातग्रस्‍त झाले. अपघातानंतर विमानाला लागलेल्‍या आगीत 2 जणांचा मृत्‍यू झाला असून 182 जखमी झाल्‍याची माहिती देण्‍यात आली आहे. या विमानात 3 भारतीय प्रवासीही होते. विमानात एकूण 291 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते. यापैकी अनेक जणांचे प्राण चमत्‍कारिकरित्‍या वाचले. एकूण प्रवाशांपैकी 173 जणांना कोणतीही दुखापत झाली नाही. मृत्‍यूमुखी पडलेले 2 जण तरुण होते आणि ते विमानाच्‍या मागच्‍या बाजुला बसले होते.

अपघातग्रस्‍त विमान सेऊल येथून आले होते. धावपट्टीवर उतरताना विमानाचे शेपूट जमिनीवर धडकले. त्‍यानंतर विमानाचा मागील भाग तुटून वेगळा झाला. तर मधल्‍या भागाला आग लागली. अनेक जणांनी आपात्‍कालीन दरवाजातून उड्या मारल्‍या. बचावलेल्‍या प्रवाशांनी ट्विट करुन स्‍वतःच्‍या सुरक्षिततेची माहिती दिलीच. शिवाय अनेक जणांचा मृत्‍यू झाल्‍याची भीतीही व्‍यक्त केली.

एशियाना एअरलाईन्‍सने विमानात कोणताही तांत्रिक दोष नसल्‍याचा दावा केला आहे. हे विमान 2006 मध्‍ये विकत घेण्‍यात आले होते. विमानाचा अपघात कशामुळे झाला, याचा तपास करण्‍यात येत आहे. मात्र, विमानाच्‍या इंजिनांमध्‍ये किंवा इतर भागात कोणताही दोष नव्‍हता, असे कंपनीने एका निवेदनाद्वारे स्‍पष्‍ट केले आहे. अपघातातील तीन भारतीय सुखरुप आहेत.