आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boeing Permitted To Conduct Flight Tests Of Dreamliner

बोइंग ड्रीमलाइनर विशेष उड्डाण घेणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकी विमान उड्डाण नियामकाच्या परवानगीनंतर बोइंग 787 ड्रीमलाइनरचे विशेष उड्डाण घेण्यात येणार आहे. ड्रीमलाइनर विमानात बिघाड झाल्यानंतर ही चाचणी घेण्यात येत आहे. प्रवाशाविना कमीत कमी चालक दल सदस्यासह विमान टेक्सासवरून झेपावणार आहे. बॅटरीतील बिघाडामुळे बोइंग ड्रीमलाइनरच्या 50 विमान उड्डाणाला 16 जानेवारी रोजी स्थगिती देण्यात आली होती. जपानच्या ऑल निप्पॉन एअरवेज कंपनीच्या ड्रीमलाइनर विमानाच्या बॅटरीतून धूर निघाल्याने विमान आपतकालीन स्थितीत उतरावे लागले होते.