आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boko Haram Chief Killed In Millitary Operation, Divya Marathi

नायजेरियामधील बोको हरम या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अबुजा - नायजेरियामधील बोको हरम या दहशतवादी संघटनेचा अबुबकर शेखू या म्होरक्याचा नायजेरियन लष्कराने गुरुवारी केलेल्या कारवाईत खात्मा केला. उत्तर नायजेरियामधील बोर्नो राज्यामधील कोंडुगे भागामध्ये ही चकमक झाली. नायजेरियन सैन्याने शेखू याला यमसदनी पाठविले. या चकमकीमध्ये आणखी काही दहशतवादीही ठार झाले. नायजेरियाच्या राष्ट्रीय सुरक्षेस बोको हरमने मोठा धोका उत्पन्न केल्याचे मानले जात आहे.

आफ्रिकेमधील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेल्या नायजेरियामध्ये गेल्या पाच वर्षांपासून बोको हरमची ताकद सतत वाढत असल्याचे चित्र आहे. नायजेरियन राज्यघटनेमध्ये इस्लामिक कायद्याचा अंतर्भाव करण्याचे बोको हरमचे उद्दिष्ट आहे.या चकमकीदरम्यान नायजेरियन सैन्याने तब्बल १३५ दहशतवाद्यांना पकडण्यातही यश मिळविले आहे.