आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boko Haram Kidnaps Wife Of Cameroon’S Vice Prime Minister, Divya Marathi

कॅमेरुन उपपंतप्रधानांच्या पत्नीचे क्रूर बोको हरामने केले अपहरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याओंडे - बोको हरामच्या दहशतवाद्यांनी रविवारी (ता.27) कॅमेरूनच्या उप पंतप्रधानांच्या पत्नींचे अपहरण केले. अपहरण उत्तर प्रांतातील कोलोफाटा शहरात रविवारी पहाटे घडले. हल्लेखोरांनी उप पंतप्रधान अमाडो अली यांचे घर तसेच स्थानिक नेत्यांना लक्ष्‍य केले होते, अशी माहिती दळणवळणमंत्री इस्सा तचिरोमा बकरी यांनी दिली.

यावेळी झालेल्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या आणि अपहरण झालेल्या लोकांची संख्‍या कळू शकलेली नाही. अद्याप हल्ल्याविषयी माहिती मिळवण्‍याचे काम चालू असल्याचे बकरी यांनी सांगितले. मात्र अली यांच्या पत्नींचे अपहरण झाल्याचे स्पष्‍ट झाले आहे. बोको हरामशी कॅमरून सरकारचा संघर्ष चालू आहे. तत्पूर्वी दहशतवादी संघटनेने नायजेरियाबरोबर चालू असलेल्या संघर्षात न पडण्‍याचा इशारा कॅमरूनला दिला होता.