कानो- नायझिरियात सक्रिय असलेली दहशतवादी संघटना 'बोको हरम'ने रविवारी गुमसुरी गावावर हल्ला करून 185 महिला-मुलांचे अपहरण केली आहे. तसेच 32 पुरुषांची निर्घृण हत्या केली आहे. मात्र, गावात संपर्काचे कुठलेही माध्यम नसल्याने गुरुवारी ही घटना उजेडात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बोको हरमच्या दहशतवाद्यांनी नायझिरीयातील गुमसुरी गावावर हल्ला केला. सगळे दहशतवादी ट्रकमध्ये आले होते. गावातील जवळपास 185 महिला आणि मुलांचे त्यांनी अपहरण केले आहे. दहशतवाद्यांनी जाताना गावातील घरांवर पेट्रोल बॉम्ब फेकले. त्यात 32 पुरुषांचा मृत्यु झाला आहे.