आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बोको हरम\'ची क्रूरता: प्रसुत होणार्‍या महिलेवर वार, बाळ बाहेर येत असताना मातेचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लागोस - नायजेरियाच्या बागामध्ये दहशतवादी संघटना बोको हरमने सुरू केलेल्या नरसंहाराच्या एकेक धक्कादायक बातम्या पुढे येत आहेत. अॅमनेस्टी इंटरनॅशनलने केलेल्या दाव्यानुसार बोको हरमच्या दहशतवाद्यांनी गर्भवती महिलांचीही अत्यंत निर्घृण हत्या केली. एका महिलेला प्रसुतीदरम्यानच ठार मारण्यात आले. तिचा मृत्यू झाला त्यावेळी तिचे बाळ अर्धे बाहेर आले होते. गेल्या सहा वर्षातील बोको हरमचा हा सर्वात भीषण हल्ला असल्याचे अॅमनेस्टीचे म्हणणे आहे.

हल्ल्याच प्राण वाचलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी अंधाधुंद फायरिंक करत महिलांची हत्या केली. अनेक बालकांचीही निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
अॅमनेस्टीनुसार, उत्तर-पूर्व नायजेरियामध्ये चाड तलावाला लागून असलेल्या बागामध्ये 3 जानेवारीला झालेल्या हल्ल्यात शेकडो लोकांची हत्या करण्यात आली आहे. त्यातही लष्कराची मदत करणा-यांच्या अधिक हत्या करण्यात आल्या. एकूण किती लोक मारले गेले हे माहीत नाही, पण ते फक्त गोळ्या झाडत होते. मी प्राण वाचवून पळालो असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
एएफपी वृत्तसंस्थेने एका प्रत्यक्षदर्शीचया हवाल्याने सांगितले की, बागामध्ये रस्त्यांवर मृतदेह पडलेले असून ते सडायला सुरुवात झाली आहे. दहशतवाद्यांच्या भीतीने रस्त्यावरून शव उचलण्याचे काम अवघड होत आहे. बागामधून पळालेल्या आणि तीन दिवस दहशतवाद्यांपासून लपणार्‍या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावर पाच किलोमीटर पर्यंतच्या परिसरात मृतदेह विखुरलेले आहेत.

आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये 2000 लोकांच्या हत्येचे वृत्त आल्यानंतर नायजेरियाच्या लष्कराने केवळ 150 जणांची हत्या झाल्याचा दावा केला होता. सुरक्षा संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांच्या संख्येबाबत माहिती मिळणे अथ्यंत कठीण आहे त्याचे कारण म्हणजे बागामध्ये अजूनही दहशतवादी असून त्याठिकाणी जाणे अत्यंत कठीण आहे.
पुढील स्लाइड्सवर सॅटेलाईट इमेजेसद्वारे पाहा, हल्ल्यापूर्वी आणि नंतरची बागा येथील स्थिती... तसेच बोको हरमने केलेली जाळपोळ... मृतदेहांवर झोपून महिलेने वाचवला जीव...
अखेरच्या स्लाइडवर पाहा VIDEO
सौजन्य- हफिंग्टन पोस्ट