आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bomb Blast Near Pakistan Afganistan Border 14 Dead

पाकिस्तान - अफगाण सीमेजवळ स्फोटात 14 जणांचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. रविवारी रात्री झालेल्या चमन येथील एका बॉम्ब स्फोटात तीन महिला आणि दोन लहान मुलांसह एकुण 14 जणांचा मृत्यू झालाचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. या हल्यात सात लोक जखमी झाल्याचे देखील समोर येत आहे.
जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेलगतच्या टूबा अचकजई प्रांतात एक सुरूंग पेरलेला होता. या सुरूंगावरून एक ट्रॅक्टर जाताच मोठा स्फोट झाला. या स्फोटात ट्रॅक्टरमधून प्रवास करणारे तसेच रस्त्यावरून जाणारे अनेक जण मृत्यूमुखी पडले. या हल्यातील जखमींचा निश्चित आकडा अजून समजलेला नसून प्रधानमंत्री परवेज अशरफ यांनी या हल्याची कडक शब्दात निंदा केली आहे.