डेरा इस्माइल खान - पाकिस्तानमध्ये सोमवारी(ता.4) झालेल्या बॉम्ब स्फोटात धर्मगुरू आणि त्यांचे दोन सुरक्षा रक्षक मारली गेली. एका कार्यक्रमासाठी धर्मगुरू फकीर जमशेद आपल्या दोन सुरक्षा रक्षकांबरोबर जात होते, असे पोलिसांनी सांगितले. पाकिस्तानने जूनपासून उत्तर वझिरीस्तानमध्ये तालिबानी ठिकाणांवर नियंत्रणासाठी प्रयत्न चालवले आहेत. हा भाग अफगाणिस्तानच्या सीमेला लागून आहे. यापूर्वी अमेरिकेने दहशतवाद्यांच्या छुप्या ठिकाणांवर कारवाई करण्याची पाकिस्तानला विनंती केली होती. सोमवारी(ता. 4) झालेला बॉम्ब हल्ला हा सुफी स्थळाजवळ घडले आहे. येथे हजारो लोकांची गर्दी होती.