आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकमध्ये तहरिक-ए-इन्साफच्या नेत्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानमधील एका बॉम्बस्फोटात सोमवारी तहरिक-ए-इन्साफ पार्टीच्या एका ज्येष्ठ नेत्यासह अन्य दोघांचा मृत्यू झाला. माजी क्रिकेटपटू इम्रान खान या पार्टीचे संस्थापक आहेत.

पाकच्या वायव्य भागातील खैबर-पख्तुनख्वा प्रांतातील मुद्दी रोडवर देरा इस्माईल खान या भागात तहरिक-ए-इन्साफचे नेते फकीर जमशेद अहमद यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. वाहनात त्यांच्यासोबत असलेल्या चालक व खासगी बंदूकधारकाचाही मृत्यू झाला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असली तरी कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही. 2013 मधील निवडणुकीत फकीर यांचा पराजय झाला होता.
(फाईल फोटो : इमरान खानसोबत फकीर जमशेद)