(फोटो- न्युयॉर्कमधील बॉम्बे जंक्शन रेस्तरॉं.)
न्युयॉर्क (अमेरिका)- घरापासून, मायभूमीपासून दूर राहणाऱ्या भारतीयासाठी पारंपरिक स्वाद चाखायला मिळणे निश्चितच अभिमानाची बाब आहे. न्युयॉर्कमधील बॉम्बे जंक्शन रेस्तरॉं येथील भारतीयांना देशी चवीचा स्वाद देत राहिले आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकी दौऱ्यात या रेस्तरॉंची आम्ही माहिती मिळवली आहे.
न्युयॉर्कच्या अगदी हृदयात बॉम्बे जंक्शन रेस्तरॉं आहे. याचे मालक प्रवीत पटेल भारतीय तर आहेच पण नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील आहे. येथे भारतीय, बांगलादेशी आणि मॅक्सिकन नोकर काम करतात. खाखरा, ढोकळा असे अस्सल गुजराती पदार्थच येथे मिळत नाहीत तर वेगवेगळे पराठे, डोसे पिझ्झा, दक्षिण भारतीय व्यंजनही चाखायला मिळतात.
रेस्तरॉंसंदर्भात प्रवीत पटेल यांनी सांगितले, की शहराच्या अगदी मध्यभागी असल्याने दररोज सुमारे 1,000 ग्राहक याला भेट देतात. केवळ अनिवारी भारतीय येथे येतात असे नाही तर काही विदेशी ग्राहकही नियमित येत असतात. लंचच्या वेळी दुपारी 12 ते 4 पर्यंत एवढी गर्दी असते की काऊंटरवर रांगा लागलेल्या दिसून येतात.
प्रवीत पटेल भाजप समर्थक आहेत. नरेंद्र मोदी यांच्या राजकीय सुरवातीपासूनची प्रवीत पटेल यांना माहिती आहे. एकदा ते मोदी यांना भेटलेही होती.
पुढील स्लाईडवर बघा, प्रवीत पटेल यांच्या रेस्तरॉंचे फोटो.... आणि व्हिडिओ...