आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अणुबाँब शोधणारे बाँडचे घड्याळ 95 लाखांना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ‘थंडरबॉल’ चित्रपटात अणुबाँबचा शोध घेणार्‍या‘जेम्स बाँड ’शॉन कॉनरी च्या करामती घड्याळाची एका लिलावात दुप्पट भावाने विक्री झाली. सुमारे 95 लाख 15 हजार रुपये एवढ्या दरावर अखेरची बोली लागली..
‘ब्रिटलिंग टॉप टाइम’ असे या घड्याळाचे नाव असून क्यू ब्रँच या प्रतिष्ठित कंपनीने त्याची निर्मिती केली होती. अणुबॉम्ब किंवा किरणोत्सर्गाचा माग काढण्याची यंत्रणा हे या घड्याळाचे वैशिष्ट्य आहे. स्पेक्टरने चोरलेल्या अणुबॉम्बचा शोध घेण्यासाठी कॉनरी यांनी हे
घड्याळ हातात वापरल्याचे ‘थंडरबॉल’मध्ये दाखवण्यात आले होते. हे घड्याळ मधल्या काळात हरवले होते, परंतु नंतर एका कार-बूट विक्री व प्रदर्शनात ते सापडले.

छायाचित्र - शॉन कॉनरी करामती घड्याळा सह